करमाळा तालुक्यात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

दोन दिवसात बिबट्याने घेतला दुसरा बळी

प्रतिकात्मक छायाचित्र

टीम : ईगल आय मीडिया

शनिवारी (दि.5 ) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील अंजनगाव येथील 26 वर्षीय महिलेवर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत बिबट्याने घेतलेला हा दुसरा मानवी बळी आहे.

अंजनगाव येथील जयश्री दयानंद शिंदे ( वय 26 वर्षे ) ही महिला निंबोणीच्या शेतात गेली असता उशिरापर्यंत परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता धडापासून शीर सापडले, त्यानंतर पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिक शोध घेतला असता शीर नसलेल्या अवस्थेत जयश्री शिंदे यांचा मृतदेह आढळून आला.

बीड-अहमदनगर ते करमाळा नरभक्षक बिबट्याचा प्रवास ? या नरभक्षक बिबट्यांनी आष्टी ( जिल्हा बीड ) येथे तीन जण ठार केल्याची माहिती आहे आणि कर्जत ( जि. नगर ) येथे दोन अशा पाच जणांचा बळी घेतल्यानंतर त्याने करमाळा तालुक्यात प्रवेश केला आहे अशी चर्चा आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने तीन पिंजरे लावले असून 40 कर्मचारी आहेत वेळ प्रसंगी आता या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारा अशी मागणी जनतेतून होत आहे

त्यामुळे करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच तालुक्यातील लिंबेवाडी येथील शेतकऱ्याचा बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्याचेही शीर धडपासून वेगळे झालेल्या अवस्थेत सापडले होते. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आ.संजय शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सूचना केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!