तर उपसरपंच पदी आदिनाथ देशमुख यांची निवड
सरपंच तेजमाला पांढरे उपसरपंच आदिनाथ देशमुख
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या करकंब ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजमाला शरदचंद्र पांढरे तर उपसरपंचपदी आदिनाथ नरहरी देशमुख हे विजयी झाले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नरहरी देशमुख गटाचे ९ सदस्य विजयी झाले होते. तर बाळासाहेब देशमुख गटाचे ८ सदस्य निवडून आले होते. सरपंच पद हे नामाप्र साठी राखीव होते.
आज सरपंच, उपसरपंच निवडीसाठी नूतन सदस्यांच्या बैठकीत निवडडणूक निर्णय अधिकारी म्हणून यु एस साखरे यांनी काम पाहिले. करकंब ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तेजमाला पांढरे व राहुल पुरवत यांनी तर उपसरपंच पदासाठी आदिनाथ देशमुख व संतोष धोत्रे यांनी अर्ज दाखल केले होते.
ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नगरकर यांनी गुप्त मतदान घेण्याची विनंती निवडणूक निर्णय अधिकारी साखरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार गुप्त मतदान झाले, यावेळी सरपंच पदासाठी तेजमाला पांढरे यांना ९ मते तर राहुल पुरवत यांना ८ मते मिळाली उपसरपंच पदासाठी आदिनाथ देशमुख यांना ९ मते तर संतोष धोत्रे यांना ८ मते मिळाली.
निवड झाल्यानंतर नूतन सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार करण्यात आले, तसेच कार्यकर्त्यांनीफटाके उडवून आणि गुलाल उधळून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.