अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी संशोधन क्षेत्रात नाव कमवावे : प्रा. डॉ. दादासाहेब साळुंखे
पंढरपूर : eagle eye news
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी अथक परिश्रमातून संशोधन क्षेत्रामध्ये कामगिरी करुन समाजाला अधिक समृद्ध करावे, असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल विभागाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (मेसा) व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिवसाचे औचित्य साधून पोस्टर व पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेच्या परितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर येथील युनिक सायन्स क्लासचे डायरेक्टर यशवंत वाघ यांनी केले.
अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी पोस्टर व पेपर सादरीकरणाद्वारे सर्वांसमोर मांडल्या. सदरच्या स्पर्धेमध्ये अभियांत्रिकी डिग्री व डिप्लोमा महाविद्यालयाच्या सुमारे 123 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी स्पर्धा आयोजीत करण्यामागील उद्देश विषद करून सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांना प्रोत्साहित केले.
पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये सुरज गायकवाड, सोनम रुपनर, साक्षी अधटराव, महेश वंडाळे या ग्रुपला प्रथम क्रमांक तर पृथ्वीराज कोळेकर, प्रसाद सगर, रितेश बागल ,चिक माने सचिन यांना द्वितीय क्रमांक मिळाला. पेपर प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक रितेश बागल, प्रसाद सगर, पृथ्वीराज कोळेकर या ग्रुप ला तर गोपाल बोईनवाड व ग्रुप ला द्वितीय क्रमांक यांना मिळाला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करणायात आली.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.