सर्व विद्यार्थ्यांना 50 टक्के फी सवलत द्या !

कर्मयोगी विद्यानिकेतन च्या पालकांची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण अर्थकारण कोलमडून पडलेले असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पालकांना 50 टक्के फी सवलत देऊन दिलासा द्यावा अशी कर्मयोगी विद्यानिकेतन च्या व्यवस्थापनाकडे पालकानी केली आहे.

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पवार यांची भेट घेऊन त्यांना संयुक्त निवेदन दिले आहे.

त्यामध्ये कोरोना महामारी मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे अंगणवाडी ते सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक फी मध्ये 50 टक्के सवलत द्यावी अशी विनंती केली आहे.

यावर मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पवार यांनी पालकांच्या भावना व्यवस्थापनास कळवू आणि जो निर्णय होईल तो पालकांना सांगितला जाईल असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!