गॅरंटी बंद असल्याचे सिद्ध करावे अन्यथा कर्नाटक सरकार भाजपविरुद्ध न्यायालयात जाणार
पंढरपूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील आजवरचे सर्वात खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी माझ्यावर ७०० कोटी रूपये एक्साईज विभागात घोटाळा केल्याचा आरोप केला. तो आरोप मोदींनी सिद्ध करावा, मी राजीनामा देतो, आणि सिद्ध नाही झाले तर त्यांनी राजीनामा द्यावा असे आव्हान दिले, मात्र त्यावर त्यांनी तो आरोप सिद्ध केला नाही, कर्नाटक सरकारने निवडणुकीत जाहीर केलेल्या पाच हि गॅरंटी चालू आहेत आणि जनतेला त्याचा लाभ मिळतो आहे. मात्र भाजपने कर्नाटकात या योजना बंद असल्याच्या खोट्या जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातीविरोधात आपण न्यायालयात जाऊ असा ईशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवेढा येथे दिला.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या आले होते. यावेळी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कर्नाटकचे उद्योग मंत्री एम बी पाटील, खा. प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सिद्धरामय्या म्हणाले कि, मे महिन्यात आमचे सरकार आले, जून पासून राज्यातील महिलांना एस टी बस मोफत केली, ३६५ कोटी महिला प्रवाश्यांननी याचा लाभ घेतला आहे, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, भाग्यलक्ष्मी योजना चालू आहे, शक्ती योजना राबवली आहे.युवकांना स्टेपेंड दिला जातो, निवडणुकीत आश्वासन दिलेल्या ५ गॅरंटी आमलात आणलेल्या आहेत. या सर्व पाच गॅरंटी योजना राबवण्यासाठी ५६ हजार कोटीं रुपयांची तरतूद केली आहे.
कर्नाटकात प्रत्येक कुटुंबाला साडे चार हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. आणि वर्षाला ५५ ते ६० हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळतात. याचा लाभ भाजपच्या मतदारांनाही झालेला आहे.आमच्या ५ गॅरंटी योजनेबाबत महाराष्ट्र भाजप.खोटी जाहिरात करीत आहे. आम्ही विमानाची सोय करू मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष येऊन पहावे, कर्नाटक चा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, गॅरंटी बंद असेल तर राजीनामा देतो, नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा असे आव्हान करून या खोट्या जाहिराती बद्दल कर्नाटक सरकार न्यायालयात जाणार आहे, असा इशाराही यावेळी सिद्धरामय्या यांनी दिला.
Keep stick safe for Rahul Gandhi will use in his old age days