22 ते 26 पंढरपूर शहरात पुन्हा संचारबंदी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रेलाही कोरोनाच्या संकटाचा फटका बसला असून कार्तिकी यात्राही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 22 ते 26 नोव्हेंबर उभा दरम्यानच्या काळात पंढरीसह शहरालगतच्या सर्व गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरानाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची चैञी आणि आषाढी याञा रद्द झाली. याच धर्तीवर कार्तिकी याञा देखील रद्द करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर शहरासह आसपासच्या ८ ते १० गावांमध्ये २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने तिहेरी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १०० पोलीस अधिकारी, १२२१ पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एक एसआर एफची तुकडी तैनात करण्यात येणार आहे
याचबरोबर राज्यभरातून पंढरपूर ला येणारे सर्व बससेवा २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पञकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर, पो नि प्रशांत भस्मे आदि उपस्थित होते. कार्तिकी याञेसाठि पंढरपूर शहरात दिंड्या येवु नयेत यासाठी शासनाने बंदी घातली आहे.