कौठाळीत पती – पत्नी एकाचवेळी ग्रामपंचायत मध्ये

भालके गटाचे पॅनल प्रमुख सपत्नीक विजयी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

ग्रामपंचायत निवडणुकीत नात्या गोत्यातील उमेदवारांची भाऊ गर्दी होणे नेहमीचेच असले तरी मतदार राजा मात्र अशा नात्या गोत्या ना नाकारून योग्य तो निकाल लावत असल्याचे अनुभव आहेत. मात्र कौठाळी ( ता.पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकाच वेळी पती पत्नी सदस्य म्हणून विजयी झाले आहेत. भालके गटाचे ऍड. दत्तात्रय पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती यशश्री दत्तात्रय पाटील हे दोघेही विजयी झाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत आ.परिचारक आणि काळे गटाने आघाडी केली होती तर भालके गटाने अवताडे गटासोबत आघाडी केली होती. या आघाडीत भालके गटाने 9 जागा लढवल्या होत्या आणि अवताडे गटाने 2 जागा घेतल्या होत्या. निकालात परिचारक -काळे गटाने बाजी मारली असून 7 जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. तर भालके -अवताडे गटाने 4 जागा जिंकल्या आहेत.

यामध्ये भालके पॅनेल चे प्रमुख ऍड. दत्तात्रय पाटील आणि त्यांच्या पत्नी यशश्री पाटील विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत यापूर्वी पती – पत्नी निवडणूक रिंगणात उतरल्याचा इतिहास आहे. मात्र त्यावेळी पती – पत्नी जोडीला यश मिळाले नाही. मात्र पाटील दाम्पत्याने ग्रामपंचायत निवडणुकीत लखलखीत यश मिळवून एकाच वेळी ग्रामपंचायतीत प्रवेश केला आहे. कोठाळी परिसरात या विजयाची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!