तर उपसरपंचपदी पूनम निकम यांची निवड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
केसकरवाडी (ता.पंढरपूर) येथील
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी परिचारक गटाच्या रुपाली प्रकाश
केसकर यांची तिन मताने तर उपसरपंच पदी पुनम सोमनाथ निकम
यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या
निवडणूकीत नऊ पैकी सहा जागा जिंकत परिचारक गटाने एकहाती
सत्ता मिळवली होती.नुतन सदस्यांची सरपंच, उपसरपंच निवडी साठी
आज बैठक घेण्यात आली होती.
यावेळी आप्पासाहेब मासाळ,
रणजितसिंह ढोबळे, रुपाली केसकर, राणी केसकर, पूनम निकम,
रेश्मा मुजावर गणेश केसकर, ज्ञानेश्वर माने, सीमाताई मासाळ हे
सदस्य उपस्थित होते. यावेळी सरपंच पदासाठी रुपाली केसकर व
सीमा मासाळ यांनी तर उपसरपंच पदासाठी पुनम निकम यांनी अर्ज
दाखल केला होता.
यावेळी सरपंच पदासाठी सदस्यांच्या मागणी
नुसार गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले यामध्ये रूपाली केसकर
यांना सहा तर सीमा मासाळ यांना तीन मते मिळाली. निवडणूक
निर्णय अधिकारी श्री.लिगाडे यांनी केसकर ह्या तीन मताने विजयी
झाल्याचे घोषित केले. तर उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज
असल्याने पुनम निकम यांची बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
यावेळी ग्रामसेविका एस.बी.बडेकर, सोसायटी चे माजी अध्यक्ष
हनुमंत केसकर, माजी सरपंच तुकाराम केसकर, मारूती
मासाळ,अब्बास मुजावर यांच्या सह केसकरवाडीतील पांडुरंग
परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.