उजनीत येणारा विसर्ग 42 हजार क्यूसेक्स

खडकवासला विसर्ग 47 हजार क्यूसेक्स

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भीमेच्या खोऱ्यात दोन दिवसांत झालेल्या विक्रमी पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग झपाट्याने वाढला असून आज सकाळी दौंड जवळ हा विसर्ग 42 हजार 882 क्यूसेक्स चा होता. दरम्यान खडकवासला धरणातून 47 हजार क्यूसेक्स चा विसर्ग करण्यात आल्याने उजणीचा विसर्ग सायंकाळी 50 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. रात्री 11 वाजता उजनी धरणात 1.70 टक्के इतका पाणी साठा झाला आहे.

भीमा नदीच्या खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमा, मुळा, मुठा खोऱ्यातील धरणे वेगाने भरत आली आहेत. खडकवासला धरणातून काल दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात केली, रात्री 9 वाजता 25 हजार क्यूसेक्सचा विसर्ग वाढवण्यात आला.तर रात्री 11 वाजता 40 हजार क्यूसेक्स करण्यात आला असून पहाटे पासून 47 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे दौंड जवळ उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा वीसर्ग वाढून 42 हजार क्यूसेक्स वर गेला आहे. आज दिवसभर उजनीच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होणार असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!