पंढरपूर : ईगल आय न्यूज
खर्डी ( तालुका पंढरपूर ) येथील घराच्या
दरवाजाचे कुलूप तोडून शनिवारी रात्री चोरट्यांनी घरातील २ लाख २७ हजार रूपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि.२०) पहाटेच्या सुमारास निदर्शनास आली.
विलास जगन्नाथ घाडगे यांचे खर्डी हद्दीत राहते घर आहे. दि.१९ मे रोजी रात्री ११.३० वाजता घरातील खोलीला कुलूप लावून सर्वजण दुसरीकडे झोपले होते. दरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून खुंटीला अडकवलेल्या पर्समधील २ लाख रूपये किंमतीचे ४ तोळे सोन्याचे गंठण तसेच ६० ग्रॅम चांदीचे पैंजण, १० ग्रॅम चांदीच कडे व २० ग्रॅम चांदीचे जोडवे असे ७ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले.
पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे कुटूंबियांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार नलवडे हे करीत आहेत.