खरसोळी च्या सरपंचपदी कु. प्रज्ञा कसबे : उपसरपंचपदी रूपाली पवार

सरपंच साॅफ्टवेअर इंजिनिअर, तर उपसरपंच पदवीधर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खरसोळी तालुका पंढरपूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या कुमारी प्रज्ञा महेश कसबे तर उपसरपंचपदी परिचारक गटाच्या रूपाली अमर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नूतन सरपंच प्रज्ञा कसबे या पुणे येथील उद्योजक तथा खरसोळीचे मुळ रहिवासी महेश कसबे यांच्या कन्या आहेत त्या साॅफ्टवेअर वेअर इंजिनिअर असून त्यांनी प्रतिष्ठेसाठी गावची निवडणूक लढविली आहे. उपसरपंच रूपाली पवार या पदवीधर आहेत.

या निवडणूकी दरम्यान परिचारक, काळे शेतकरी संघटनेची युती झाली असताना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष हणमंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बॅनरखाली उमेदवार उभे केले. निकलानंतर परिचारक काळे गटाला सहा तर राष्ट्रवादीला अवघ्या तीन जागा मिळाल्या आरक्षित सरपंचपदाचा उमेदवार परिचारक काळे गटाकडे नसल्याने राष्ट्रवादीच्या प्रज्ञा कसबे यांनी सरपंचपद पटकाविले.

सरपंच निवडीप्रसंगी सरपंचपदासाठी प्रज्ञा कसबे व रूपाली पवार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अनुक्रमे निवड करण्यात आली. अभ्यासी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळअधिकारी ढवळे यांनी सहाय्यक म्हणून ग्रामसेवक खवळे यांनी काम पाहीले.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष हणमंत पवार उद्योजक महेश कसबे, संचालक राजू पाटील, बाजीराव पवार, बंडू पवार, आनंद पवार शेतकरी संघटनेचे छगन पवार, सिध्देश्र्वर पवार, मोहोन काळे, लहू पवार, संजय कसबे जनार्दन पवार. उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!