खेडभोसे गाव बनले कोरोना मुक्त गाव

प्रशासनाची तत्परता; ग्रामस्थांचे सहकार्य

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दोन महिन्यांपूर्वी खेडभोसे (ता. पंढरपूर) येथे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. ग्रामस्थ घाबरल्यामुळे आणि रुग्ण दवाखान्यात न जाता घरातच राहिल्याने कोरोना बाधितांची संख्या 150 च्या पुढे पोहोचली होती. ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू, जंतुनाशकाची फवारणी, कोरोना चाचणी, गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई या उपाययोजनांमुळे आज खेडभोसे गावाने आज कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे.

65 एकर येथील कोरोना सेंटर मध्ये उपचार घेणारे 6 रुग्ण (दि. 2) घरी सोडण्यात आले आहेत, तर कालच गावात रॅपिड टेस्ट घेण्यात आली, त्यात एकही ग्रामस्थ positivh सापडला नसल्यामुळे खऱ्या अर्थाने गाव कोरोना मुक्त झाले आहे.

सरपंच सज्जन लोंढे, उपसरपंच माधुरी जमदाडे, ग्रामसेवक महेश खांडेकर, पोलिस पाटील नंदिनी गवळी, तलाठी प्रकाश भिंगारे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रारंभी सात दिवस व नंतर दहा दिवस असा जनता कर्फ्यू लागू केला होता.


ग्रामपंचायत सदस्य सुरेश पवार, डॉ. प्रशांत जमदाडे, पोपट पवार, शहाजी जमदाडे, बंडू पवार, माजी उपसरपंच सिध्देश्वर पवार, चेअरमन कल्याण पवार, माजी सरपंच विष्णु गवळी हेमंत पवार यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामस्थांत जागृती करत नियम पालनाचे महत्त्व पटवून दिले.

दोनवेळा संपूर्ण गावात स्वच्छता, जंतुनाशकाची फवारणी केली. ग्रामस्थांनी नियम पाळले. त्यांच्या सहकार्यामुळे गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू. साफ सफाईसह जंतुनाशकाची फवारणी केली. सॅनिटायझर चा वापर केला. सुरुवातीला ग्रामस्थांना कोरोनाची तीव्रता लक्षात आली नाही. त्यामुळे बहुतेक रुग्ण घरीच राहिल्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. कोरोना चाचणीवर भर दिला. जनता कर्फ्यू, कोरोना चाचणीला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश.

सज्जन लोंढे, सरपंच,

खेडभोसे ता. पंढरपूर


कोरोना बाधितांना आकडा लक्षणीय रित्या वाढल्यामुळे प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले आणि करकंब पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपाययोजना केल्या.

ग्रामपंचायतीसह आशा वर्कर सौ. राऊत, उमेश गोरे यांच्यासह आरोग्य विभाग आणि शिक्षकांनी एकदिलाने काम केले. ग्रामस्थांनीही सहकार्य केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटली. ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले, त्यामुळे गाव कोरोना मुक्त होऊ शकले.

Leave a Reply

error: Content is protected !!