खेडभोसे ग्रामस्थांकडून यूवकांचा सन्मान

विविध क्षेत्रातील यश, नामवंत कंपनी मध्ये नोकरीबद्दल सत्कार

पंढरपूर : ईगल आय न्यूज

खेडभोसेगावातील विविध क्षेत्रात प्रावीन्य मिळवलेल्या युवकांचा दिवाळी सणानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

संदीप सिद्धेश्वर पवार, डॉक्टर योगेश आप्पाराव पवार, सॄष्टि सिध्देश्वर पाटील , महेश दामोदर पवार, पवन सोमनाथ भोसले, विशाल राजेश पवार, अरविंद दिलीप पाटील या युवकांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले आहे.

त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छापर सत्कार सोहळा आयोजित केला होता.

सदर प्रसंगी गावच्या पोलीसपाटील सौ.नंदिनी गवळी, विठ्ठल साखर कारखाना संचालक श्री.कालिदास साळुंखे, विठ्ठल क्रेडिट सोसा.संचालक हनुमंत पवार, मराठा महासंघ सोलापूर शहर अध्यक्ष सदाशिव पवार, चंन्द्रभागा सह.साखर कारखाना मा.कामगार संचालक बंडु पवार, मा.सरपंच विष्णु गवळी, मा.उपसरपंच सुरेशनाना पवार, सिद्धेश्वर पाटील, पांडुरंग पवार, खेडभोसे सोसायटी चेअरमन धनाजी साळुंखे, खेडभोसे सोसायटी मा.व्हा.चेअरमन विकास पवार, पशुवैद्यकीय डाॅक्टर तानाजी पवार, सोसा.संचालक बाळासाहेब पवार,प्रकाश साळुंखे, नितिन पाटील, बब्रुवान साळुंखे,पोपट पवार, आप्पाराव पवार, सिद्धेश्वर पवार,भारत साळुंखे, विजय पवार, नवनाथ पवार, गणेश जमदाडे उपस्थित होते.

सर्वांना पुढील वाटचालीस सदाशिव पवार,विष्णु गवळी,बंडु पवार यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले.

Leave a Reply

error: Content is protected !!