‘त्या’ बिबट्यास ठार मारण्याची मोहीम युद्धपातळीवर

8 वर्षीय मुलीचा बिबट्याने घेतला बळी : करमाळा तालुक्यातील चिखलठाणा येथील

मयत मुलीचे शोकाकुल कुटुंबीय

टीम : ईगल आय मीडिया

गेल्या 6 दिवसांपासून करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक बिबट्याने सोमवारी तिसरा मानवी बळी घेतला असून चिखलठाणा येथे 8 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून गंभीर जखमी केले, त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान या बिबट्यास जिवंत पकडणे किंवा ठार मारण्यास वनविभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम आखली जात आहे.

ज्या परिसरात बिबट्या आढळून आला त्या परिसरातील ऊसाचे फड पेटवून देण्यात आले आहेत.

करमाळा तालुक्यातील लिंबवाडी, अंजनगाव येथील एक महिला, एका पुरुषाचा बळी घेतल्यानंतर सोमवारी बिबट्याने चिखलठाना येथील राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. यावेळी ही चिमुकली खेळत असताना शिवारात असलेल्या केळीच्या पिकातून आलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला.

आ.संजय मामा शिंदे यांनी या बिबट्यास ठार मारण्यात यावे अशी मागणी वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार आजच वन्यजीव अधिनियम संरक्षण कायदा १९७२ च्या कलम 11 मधील (१) (अ) कलमानुसार मुख्य वन्यजीव रक्षकांना लिखित स्वरूपात आदेश देता येतात. चौकशीनंतर त्यांनी प्रथम पकडण्याचे, शक्य नसल्यास dart मारून बेशुद्ध करण्याचे आणि नंतर गोळ्या घालून मारण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी ऊसतोड मजुरांनी बिबट्याच्या तावडीतून मुलीस वाचवण्याचा प्रयत्न केला. कु.फुलाबाई हरीचंद्र कोठाले असे त्या चिमुकलीचे नाव असून या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत तीला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याबरोबरच करमाळा तालुक्यातील जनतेमधून वन विभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप पसरला आहे.

बिबट्यास पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यानी पिंजरे आणून लावण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!