किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

टीम : ईगल आय मीडिया

क्रुज ड्रग्ज प्रकरण आणि फसवणुकीच्या विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला किरण गोसावी अखेर सापडला आहे. किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.  प्रभाकर साईल आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. आजच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे ही सांगितले जाते.

आर्यनखानला अटक केल्यानंतर त्याच्या सोबत सेल्फी घेणारा किरन गोसावी चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच बॉडीगार्ड प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. फसवणूक प्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याचंही म्हटलं जात होतं.

पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ होती. पुणे पोलिसांचं पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झालं होतं. लखनौ पोलिसांना त्याने शरण देण्याची विनंती केली होती मात्र इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनौ पोलिसांनी दिला होता. गोसावी लखनौमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. त्यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे.  

Leave a Reply

error: Content is protected !!