70 वर्षीय वृद्ध इसमाचा उपचार सुरू असताना मृत्यू
पंढरपूर : ईगल आय मीडिया
वाखरी येथील एम आय टी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या सुमारे 70 वर्षे वयाचा इसमाचा गुरुवारी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शुगर आणि बीपीचा त्रास असलेल्या या इसमाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पंढरपूर तालुक्यात कोरोनामुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे.
रोहिदास चौकातील 70 वर्षीय इसम पॉझिटिव्ह आलेला होता आणि त्याच्यावर वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या वृद्धाचा रक्तदाब खालावल्याने त्यास तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्या इसमाचा कुटुंबातील 4 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. इसमावर त्याला दहा दिवसापासून येथे उपचार सुरु होते. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता असे सांगण्यात येते त्यामुळेच गुरुवारी दुपारी तब्येत खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान पंढरपूर तालुक्यातील कोरोनामुळे हा 4 था बळी गेला आहे. बुधवारी सोलापूर येथे रोहिदास चौकातील एकाचा मृत्यू झाला आहे.