पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना बाधित लोकांची संपर्क साखळी मर्यादित राखण्यात प्रशासनाला यश आले असून, जास्तीत जास्त swab तपासणी लवकर झाल्यास पंढरपूर शहर व तालुका करोना मुक्त होण्याची शक्यता बळावली आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात सध्या 30 ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 23 रुग्णांवर वाखरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर एक रुग्ण सोलापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू पावला आहे.
आजवर पंढरपूर तालुक्यातील 832 संशयितांचे swab तपासण्यासाठी घेतले आहेत. त्यापैकी 737 अहवाल प्राप्त झाले आहेत, 95 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत तपासणी झालेली 695 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, तर 38 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यापैकी 8 रुग्ण आजवर बरे होऊन घरी पाठवले आहेत.
सध्या 30 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. त्यापैकी चोवीस रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यातील आहेत आणि उर्वरित रुग्णांपैकी दोन रुग्ण मुंबईचे तर चार रुग्ण इतर तालुक्यातील आहेत.
येत्या 2 दिवसात वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यात येणार आहेत. सध्या प्रलंबित असलेल्या 95 पैकी किती अहवाल पॉझिटिव्ह येतात यावर कोरोनाचा प्रभाव किती आहे हे स्पष्ट होईल.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संपर्क साखळी तोडण्यामध्ये प्रशासनाला यश आलेले आहे. तालुक्यात सापडलेले बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण हे मुळातच क्वारंटाईन झालेले होते. त्यामुळे त्यांचा स्थानिकांशी फारसा संपर्क झालेला नाही.
शहरातील ज्या बँकेच्या संचालकामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली त्या रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचा शोध घेऊन त्यांचे swab नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आणि त्या रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांना अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुरेशी दक्षता घेतलेली दिसून येत आहे. व पॉझिटिव्ह रुग्णांचा स्थानिकांशी असलेला संपर्क मर्यादित करण्यामध्ये प्रशासनाला यश आलेले आहे. अशा परिस्थितीत शहरातील व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चिंताजनक परिस्थिती निर्माण करेल असे चित्र दिसत नाही. यासाठी आरोग्य विभागाने जास्तीत जास्त swab तपासणी संख्या वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. संपर्क आलेल्या तीव्र जोखमीचे आणि कमी जोखमीचे असलेल्या किंवा कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांचे जास्तीत जास्त swab तपासणी करण्याची गरज आहे. जेवढ्या कमी वेळात जास्त तपासण्या होतील, तेवढ्या वेगात कोरोनाला पायबंद घालणारे शक्य होणार आहे. हे लक्षात घेता आरोग्य विभागाने जास्तीत जास्त संशयितांचे swab तपासणी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
एकाच संचालकांमुळे 12 लोक पॉझिटिव्ह
शहरात पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याची संख्या दिसत असली तरी ती वाढण्यास त्या बँकेचा एकच संचालक जबाबदार आहे असे दिसून येते. एकाच संचालकांच्या संपर्कातील 12 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्याच्याशी संबंधित लोकांचेही बहुतेक अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्याशिवाय इतर बाधित रुग्ण मुळातच क्वारंटाईन होते त्यामुळे त्यांची संपर्क साखळी जवळपास खंडित झालेली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना वाढीला लवकर पायबंद बसेल असे चित्र निर्माण झाले आहे.