तहसीलदारांचा अहवाल आला निगेटिव्ह
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज वाढली असून आणखी 7 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. यामध्ये बँकेच्या 2 संचालकांसह गाडीचा चालक ही बाधित झाला आहे.
एका बँकेचा संचालक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला असून त्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क लोकांची लक्षणे पाहून swab तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष, एक व्यापारी आणि एका वाहन चालकाचा समावेश असल्याचे समजते. यामुळे शहरातील रुग्णांची एकूण संख्या 9 झाली आहे.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या इसमाची आरोग्य तपासणी केलेल्या पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरातील शिक्षक असलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याची आरोग्य तपासणी डॉक्टर असलेल्या तहसीलदार वाघमारे यांनी केली होती. त्यांनीच लक्षणे तीव्र असल्याने swab तपासणीसाठी शिफारस केली होती. त्या इसमाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तहसीलदार वाघमारे यांचाही swab तपासणी साठी दिला होता. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील प्रशासन “टेन्शन फ्री ” झाले आहे.