24 तासात 8968 नवे रुग्ण आले तर 10221 जण बरे होऊन गेले
टीम : ईगल आय मीडिया
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आणि बळी असलेल्या महाराष्ट्रात कोरोनाचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे मानले जात आहे. मागील महिन्यात पॉझिटिव्ह रुग्ण दररोज 10 हजाराहून अधिक सापडत होते मात्र या महिन्यात एकही दिवस 10 हजाराहून अधिक रुग्ण सापडले नाहीत. उलट दररोज घटत्या क्रमाने रुग्ण सापडत आहेत. आणि तपासण्या मात्र वाढत आहेत. त्यामुळेच राज्यात कोरोनाचे काऊंट डाऊन सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८,९६८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासात 10 221 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले आहेत. राज्यात 24 तासात २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंतची महाराष्ट्रातली करोनाबाधितांची संख्या ४, ५०,१९६ इतकी झाली असून त्यापैकी २ लाख ८७ हजार ३० लोकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १ लाख ४७ हजार १८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.एवढेच ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
राज्यात करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी मृत्यूचे हे प्रमाण 3.52 टक्के इतकेच आहे.
मुंबईत प्रसाराचा वेग मंदावला !
रुग्ण दुप्पटीचे प्रमाण 78 दिवसांवर
एका बाजुला देशात दररोज 50 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत तर दुसऱ्या बाजूला मुंबईत 1 हजाराहून कमी संख्येने नवीन रुग्ण सापडत आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 78 दिवसांवर गेला आहे.
मुंबईत केवळ 20 हजार 546 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर 90 हजार 89 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मागील 24 तासात मुंबईतील 1790 रुग्णांना घरी सोडलं आहे तर 960 नवीन रुग्ण सापडले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 76 टक्केवर गेले असून मुंबईत कोरोना मंदावला असल्याचे दिसते आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार
महाराष्ट्रात आज घडीला ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाइन, तर ३७ हजार ९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात असून तेथील रुग्णांची संख्या ४१ हजार ६६४ इतकी झाली आहे. देशाच्या तुलनेत राज्यातील मृत्यू दर हा ३.५२ टक्के इतका झाला आहे.अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.
एकूणच राज्यातील नवीन कोरोना केसेस सापडण्याचे प्रमाण दररोज घटते असल्याने तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दररोज वाढत असून मृत्यू दरही कमी होत आहे. त्यावरून राज्यात कोरोनाचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.