कोरोना रुग्ण : शनिवारी सुद्धा दिलासा

कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या, बरे होणाऱ्यापेक्षा घटली

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रोज नवीन रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कमी सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत आहे.
राज्यात शनिवारी दिवसभरात १० हजार २५९ नवीन रुग्णांचे निदान तर १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.,तर २५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात सध्या १ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दररोज हा आकडा कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील रिकव्हरी रेट आता ८६ टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने करोनाची शनिवार ची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

राज्यात शनिवारी १० हजार २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात १३ लाख ५८ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज पुन्हा वाढून ८५.६५ टक्के इतके झाले आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ८० लाख ६९ हजार १०० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १५ लाख ८६ हजार ३२१ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


सध्या प्रत्यक्षात १ लाख ८५ हजार २७० अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सध्या २३ लाख ९५ हजार ५५२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २३ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!