कोरोनाने काळजी वाढवली

नवीन रुग्ण 7 हजारांच्या वेशीवर

टीम : ईगल आय मीडिया 

राज्यात गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासांत 2417 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आज 35 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत एकूण 21, लाख 884 रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 51 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यात 52,956 रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागानं दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. गेल्या 8 दिवसांपासून दररोज चढत्या क्रमाने रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे कोरोना बाबत शासन,प्रशासन गंभीर झाले आहे.

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजपासून राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही हा निर्णय जनतेने घ्यावा, असंही नमूद केलं. लॉकडाऊन करायचा नसेल तर मास्क वापरा आणि नियम पाळा. अन्यथा 8 दिवसानंतर लॉकडाऊनवर निर्णय घ्यावा लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधलाय.

नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे. गेल्या 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल पाच महिन्यानंतर सर्वाधिक 9443 चाचण्या झाल्या. त्यापैकी 725 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!