लखीमपुर शेतकरी हत्या निषेधार्थ उद्या जिल्हा बंद

काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे आवाहन


टीम : ईगल आय मीडिया

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ‘ महाराष्ट्र बंद ‘ची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्हा कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन, काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील पत्रकार परिषदेत केले. दरम्यान बैठकीत लखीमपूर खेरी घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


काँगेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिलेली आहे . राष्ट्रीय नेत्यां प्रियंका गांधी यांनी या घटनेचा कडाडून विरोध केला.त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भेटीला जात असताना. त्यांना योगी सरकारने सत्तेच्या जोरावर ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकले. भाजपचं सरकार शेतकऱ्यांशी क्रूरपणे वागत आहे. त्यांचे आंदोलन चिरडत आहे. लखीमपूर घटनेतील आरोपींना अटक करून कठोरपणे शिक्षा करावी.

या निषेधार्थ जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात यावा यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तसेच जनतेनेही अन्याय व अत्याचाराचा कडाडून विरोध करण्यासाठी बंद मध्ये सहभागी व्हावे. असेही आवाहन मोहिते पाटील यांनी केले. भाजपचं सरकार जनरल डायरप्रमाणे वागत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडणाऱ्या भाजपचा खरा चेहरा दिसला असल्याचे सांगत लखीमपूर खेरी घटनेसंदर्भात डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी खेद व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!