लम्पि रोग : तालुक्यातील 16 गावात 28 जनावरे बाधीत

पंढरपूर तालुक्यात 92 टक्के गाईं, बैलांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पुर्ण

पंढरपूर : ईगल आय न्यूज

 लम्पी त्वचारोगाचा  प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत असून पंढरपूर तालुक्यातील 92 टक्के गाई आणि बैलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  तालुक्यात गोवंशीय जनावरांची संख्या सुमारे  89 हजार इतकी असून, आतापर्यत 82 हजार 671  गोवंशीय जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले असल्याचे पशुसंवर्धन सह. आयुक्त डॉ.एस.एस. भिंगारे यांनी सांगितले.

तालुक्यात आतापर्यत 28  जनावरे लम्पी त्वचा रोगाने बाधित झाली असून,  त्यापैकी 8   जनावरे उपचारानंतर पुर्णपणे बरी झाली आहेत. 17 जनावरांवर उपचार सुरु असून, 3 जनावरे मयत झाली आहेत.  लम्पीने मृत झालेल्या  एका जनावराच्या मालकाला 30 हजार रुपये मोबदला देण्यात आला आहे. तर उर्वरित 2 जनावरांच्या मालकांना मोबदला देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही पशुसंवर्धन सह. आयुक्त डॉ. भिगारे यांनी दिली.

लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभाग सज्ज असून, जनावरांच्या तत्काळ उपचारासाठी 10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील 16 गावांमध्ये लम्पी आजाराची जनावरे आढळून आली आहेत. तालुक्यात  92  टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले असून,  लसीकरण राहिलेल्या पशुधनाचेही वेगाने लसीकरण सुरु आहे. 

 लम्पी त्वचारोगाची बाधा गोवंशीय पशुधनाला होत असून, पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.या पशुधनाचे वेगाने लसीकरण करण्यात येत असून  लसीकरणाबाबत पशुपालकांनी व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.  प्रियंका जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!