महाडजवळ दरड कोसळली : 30 घरे दबली

कणकवली जवळ चा पूल तुटला

टीम : ईगल आय मीडिया

महाड जवळ एका गावामध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. या दुर्घटनेत 30 घरे गाडली गेल्याने जवळपास 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्याशी दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे. त्यामुळे अधिक स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. लवकरच यासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल.

ही बातमी वाचली का

कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस आहे. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोिमटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, भोर-महाड मार्गावर अनेक ठिकणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला आहे. पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक प्रवाशी अडकले आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या परिसरात 249 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. बुधवारी रात्रीपासून या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. या मार्गावर अनेक ठिकाणी पडझड झालीय. याच भोर-महाड मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत भोर-महाड रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!