अजूनही 97 जण बेपत्ता

सातारा आणि रायगड जिल्ह्यातील दरडींची दहशत कायम

टीम : ईगल आय मीडिया

दोन दिवसांपासून सातारा आणि रायगड जिल्ह्यात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे, मात्र अजुनही या दोन्ही जिल्ह्यात सुमारे 97 जण बेपत्ता आहेत.त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गुरुवारी तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आली असून दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही ४४ जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. तर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी तालुक्यात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. आतापर्यंत 20 हुन अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अजूनही 12 जण अजूनही बेपत्ता आहेत.

रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे महापुराच्या संकटाचा सामना करत असतानाच डोंगर कड्यानी ही घाव घातल्ल्याचे दिसू लागले आहे. रायगडमधील महाडजवळ तळीये हे अख्खे गाव दरडीखाली गाडले गेले. त्यानंतर आसपासच्या कडेकपारीतील गावांमधील रहिवाशांवर दहशतीच्या दरडी कोसळू लागल्या आहेत. शनिवारी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी परिसरातील जमिनीला भेगा गेल्या असून तेथील माती ढासळू लागली आहे.

साताऱ्यामध्येही दरडींखाली अडकलेल्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याने प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांकडून दरडीखाली अडकलेल्यांच्या शोधासाठी शर्थ करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यासमोरील आव्हान मोठे असल्याने शोधकार्य सुरूच आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये व पोलादपूर येथील कानवळे व सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर महाड, पोलादपूर तालुक्यातील डोंगरकपारीत असलेल्या गावातील रहिवाशांना चिंतेने पोखरले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!