लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप

लाखो लोकांची गर्दी : पाणावलेले डोळे

दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या अंत्ययात्रेचा व्हीडिओ पहा !

सांगोला : ईगल आय मीडिया

जेष्ठ नेते माजी आ.गणपतराव देशमुख यांना आबासाहेब अमर रहे अशा जय घोषात अंत्ययात्रा सुरू झाली. आज सांगोला येथे हजारो शोकाकुल नागरिक साश्रु नयनांनी निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभा होते. राज्यभरातून तसेच संपूर्ण सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील समर्थक आबांच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले आहेत.

शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात येणार असल्याने पंढरपूर – सांगोला रस्त्यावर त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. सोलापूर, मोहोळ,पंढरपूर या मार्गावर जागोजागी लाखो लोकांनी दिवंगत नेत्याचे अंतिम दर्शन घेतले.

आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचं पार्थिव सांगोला तालुक्यात दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पंढरपूरवरून येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उभे होते. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सांगली तालुक्यात आबासाहेबांचं पार्थिव आले असता नागरिकांनी ‘आबासाहेब अमर रहे’ अशा घोषणाही दिल्या.

गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

error: Content is protected !!