माजी खा. मोहिते – पाटील, खा. स्वामी, आ. सुमनताई पाटील यांनी घेतली भेट

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर-मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी मान्यवरांची रीघ लागली होती. माजी खा. विजयसिंग मोहिते पाटील, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांनी सरकोली येथे येऊन भालके कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी आलेल्या मान्यवरांनी आम.भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आ.भारत भालके यांच्या अकाली निधनाने सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आबालवृद्द भालकेंच्या आठवणी काढून अजूनही शोक व्यक्त करीत आहेत.
आज गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आ.सुमनताई पाटील यांनी भेट देऊन भालके कुटूबाचे सांत्वन केले आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेल्या तीन दिवसांत ना. जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदींसह अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सांत्वन केले आहे.