देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह

ट्विट करून दिली माहिती :होम आयसोलेट झाले

टीम : ईगल आय मीडिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः ट्विट करून हि माहिती दिली आहे. ते होम आयसोलेट झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहेत.

गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी राज्यभरात दौरा केला. तसेच त्यांच्या कडे बिहार निवडणूकीची जबाबदारी असून बिहारमध्ये भाजपचे अनेक नेते कोरोना बाधित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसू लागल्याने होम आयसोलेट झाले आहेत. त्यापाठोपाठ फडणवीस यानाही कोरोना झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!