पंढरपूर तालुक्यातील मोठ्या नेत्यांनाही कोरोनचा फटका
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या 2 महिन्यापासून सर्व सामान्य नागरिकांना हैराण करून सोडणाऱ्या कोरोना विषाणू ने आता थेट नेत्यांच्या घरात घुसखोरी केली आहे.
तालुक्यातील जेष्ठ नेते तथा माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, त्यांचे बंधू आणि आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले जाते. सुधाकरपंत परिचारक आणि प्रभाकर परिचारक यांची तब्येत चांगली असली तरीही दोन्ही नेते वयाने 80 च्या पुढे असल्याने खबरदारी म्हनून त्यांना पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे असेही समजते.
तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 751 : शुक्रवारी 67 पॉझिटिव्ह अहवाल
दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 751 एवढी झाली आहे. शुक्रवारी शहर आणि तालुक्यात मिळून 67 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील आढिव, भोसे, करकम्ब, लक्ष्मी टाकळी, पिराची कुरोली, रोपळे, मेंढापुर, खेडभोसे, शेगाव दुमाला या गावात 36 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. शहरातील अनिलनगर, संत पेठ, रामबाग, नाथ चौक, महात्मा फुले नगर, महाद्वार, लिंक रोड, कोळी गल्ली, जुना सोलापूर नाका, जुना कराड नाका, इंदिरा गांधी भाजी मार्केट, गांधी रोड, नागपूरकर मठ, उमदे गल्ली, सावरकर नगर, सावता मठ या भागात 31 रुग्ण सापडले आहेत.
भोसे गावात सर्वाधिक 21 रुग्ण आढळून आले आहेत.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्वाचे नेते, पक्षाचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांनाही कोरोना झाला असून त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील यांनाही कोरोना पॉझिटिव्ह आहे. या दोघांवरही सोलापूर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर राजूबापू पाटील यांचे चिरंजीव ऍड. गणेश पाटील, राजूबापू पाटील याचे बंधू यांच्यासह त्यांच्या घरातील अर्धा डझन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एवढेच नाही तर भोसे गावात दोन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 50 पर्यंत गेला आहे.
या सर्वांची प्रकृती उत्तम असली तरीही काळजी घेणार्या नेत्यांच्या घरातच कोरोना घुसल्याने तालुक्यातील राजकीय क्षेत्र ही आता कोरोनाच्या टप्प्यात आल्याचे दिसून येते.
काळजी घेणे आवश्यक