शेळवे येथील पूरग्रस्त परिस्थितीची ना. दरेकर यांनी केली पाहणी

गेल्या वर्षीच्या पुरामुळे झालेली नुकसान भरपाई अजून नाही : ग्रामस्थांची तक्रार

शेळवे : संभाजी वाघुले

शेळवे ( ता .पंढरपूर ) येथे महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी झालेल्या नुकसानीची माहिती देतानाच मागील वर्षी पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळाली नसल्याची तक्रार केली.

ना. दरेकर यांनी शेळवे येथील जुना रस्त्यावरील कासाळ ओढ्यालगतच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी मा.खा.जयसिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री मा.आ.विजयकुमार देशमुख, आ.प्रशांत परिचारक, आ.गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

या कासाळ ओढ्यामुळे व भिमा नदीच्या पाण्याबरोबर घरे , जनावरे, पिके व जमिनीही वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी अशीही शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केली.

मागील वर्षी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची अजुनही भरपाई मिळाली नसल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. आम्ही येथील पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार हे सर्व भाजपच्या चिन्हावरच निवडुन आणलेले आहेत. म्हणुन आम्हाला मदत लवकर मिळावी अशी आशा आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!