दिवंगत आम भारत भालके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस हे उद्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी सरकोली येथे येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा आला आहे.
उद्या ( दि.24 रोजी ) दुपारी 1 वाजता फडणवीस हे विमानाणे पुणे येथे येणार आहेत, तिथून मोटारीने पंढरपूर मार्गे सरकोली येथे येणार आहेत. सायंकाळी सव्वा सहा वाजता आम. भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मोटारीने सोलापूर कडे प्रयाण ठेवणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आ. भालके सतत सरकारला धारेवर धरत होते. मात्र तरीही फडणवीस आणि आ.भालके यांचे व्यक्तिगत संबंध सौहार्दपूर्ण होते.
विधानसभेत फडणवीस यांनी आ. भालके यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला होता आणि त्यांचं अकाली जाणे धक्कादायक असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर वेळ काढून फडणवीस भालके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येत आहेत.