बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शर्थीचे प्रयत्न

भिवरवाडी येथील हल्ला बिबट्याचा नाही : अफवांवर विश्वास ठेवू नये

सोलापूर : ईगल आय मीडिया

करमाळा तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांनी सावधानता बाळगावी मात्र अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


दिनांक 3 डिसेंबरपासून आज (दिनांक 15 ) डिसेंबरपर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत. असेही वनविभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

तो हल्ला बिबट्याचा नाही ! दिनांक 14.12.2020 रोजी मौजे भिवरवाडी ता. करमाळा येथील गायीवर झालेला हा हल्ला तरस या वन्यप्रण्यांने केला असून ते तेथे मिळालेल्या केसाच्या सँपल व पायाच्या ठस्यावरुन सिध्द होते. तरी सर्व लोकांनी अफवावरती विश्वासू ठेऊ नये कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतात. असा इशाराही सोलापूर वनविभागाने दिला आहे.

करमाळा तालुक्यातील बिबट्याला पकडण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चकिंग, डेली पगमार्क डेटा ऍ़नालेसीस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन असे चौदा गस्ती पथकाच्या माध्यमातुन केले जात आहेत. याच बरोबर कॅमरा ट्रॅप , पिंजरे बेशुध्दी पथक-2 शार्प शुटर टिम, एसआरपीएफ, पोलिस पथक यांना पाचारण करण्यात आलेले आहे. याच बरोबर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वनकर्मचारी अहोरात्र घरोघरी पोहचून लोकांच्यामध्ये बिबट या वन्यप्राण्याविषयी जनजागृती करत आहे.

मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये गैरसमज व अफवा यांचे निराकरणक करण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे ठसे म्हणुन तरस, कुत्रे व इतर वन्यप्रण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार मध्यमामध्ये येत आहेत. तरी लोंकानी इंटरनेटच्या मध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा.

One thought on “बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शर्थीचे प्रयत्न

Leave a Reply

error: Content is protected !!