चोपडी ( तालुका सांगोला ) येथील दुर्घटना
मयत शकुंतला खळगे
टीम : ईगल आय मीडिया
शनिवार ( दि. 10 ) रोजी वीज पडल्याने चोपडी ( ता. सांगोला ) येथील शकुंतला बाबुराव खळगे ( वय 55 वर्षे, रा.गणेश नगर, चोपडी ) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शकुंतला खळगे या शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेतात गवत काढण्यासाठी गेलेल्या असताना पाऊस आल्याने एका झाडाजवळ थांबल्या होत्या.
त्यावेळी आकाशात ढगांचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर विज पडली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना तत्पुर्वीच त्यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेची नोंद सांगोला पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.