राज्यात 8 किंवा 14 दिवसांचा लॉक डाऊन ?

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून संकेत

टीम : ईगल आय मीडिया

यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही असे सांगून,  कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक  बोलावली होती.


“लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं रोखठोक मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ऑनलाईन झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. 


मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्याचे आदेश. पुढच्या दोन दिवसात निर्णय होईल. 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन असू शकतो. वैद्यकीय सचिव तात्याराव लहाने आणि आरोग्य सचिव यांची 14 दिवस लॉकडाऊनची मागणी आहे. काँग्रेसची मागणीही लॉकडाऊन 14 दिवस असावा. तर सरकार नेमकं काय करणार याचा सविस्तर प्लॅन तयार करावा, अशी भाजपची भूमिका आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!