31 मे पर्यंत लॉककडाऊन ?

लसीकरणाबाबत महत्वाची बातमी : सिरम महाराष्ट्राला लस देणार

टीम : ईगल आय मीडिया

“लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. राज्यातचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर सिरम ने 20 मे नंतर राज्याला दर महिना दीड कोटी लस देण्याचे मान्य केले असेही टोपे म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय.

राज्यात आज 58 हजार रुग्ण बरे झाले

राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात आज ४६हजार ७८१ नव्या बाधितांची भर पडली आहे. 


राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील. असेेेही टोपे म्हणाले.

यावेळी राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सिजन निर्मिती आणि साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणे, इत्यादी उपाययोजना करून राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी आणि आवश्यक ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता, राज्यामध्ये “मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याचा आणि याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Leave a Reply

error: Content is protected !!