नवी दिल्ली : ईगल आय मीडिया
देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने सलग तिसऱ्या वेळी लॉक डाऊनची मुदत वाढवली आहे. 3 मे रोजी दुसऱ्या लॉक डाऊन ची मुदत संपत असतानाच आणखी 2 आठवडे लॉक डाऊन वाढवण्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने काढली आहे. ज्या जिल्ह्यात रेड झोन आहे त्या जिल्ह्यात लॉक डाऊन कायम ठेवताना कमी बाधित किंवा पूर्णपणे कोरोना मुक्त असलेल्या जिल्ह्यात लॉक डाऊन साठी नियम काही अंशी शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच हाती येईल.