माढा विधानसभा : पंढरपूरच्या ४२ गावात नेते एका बाजूला आणि जनता दुसऱ्या बाजूला

अभिजित पाटील यांना सर्व ४२ गावात मताधिक्य : ११४ पैकी केवळ ३ बुथवर रणजितसिंह शिंदे यांना लीड

पंढरपूर

माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांना तब्बल २५ हजार ९१६ इतक्या मताचे लीड मिळाले आहे. विशेष म्हणजे ४२ पैकी एकाही गावांमध्ये अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना मताधिक्य मिळालेले नाही. पंढरपूर तालुक्यातील ११४ बूथ पैकी फक्त ३ बूथवर रणजीत शिंदे यांना मताधिक्य मिळाले असून बाकी १११ अभिजीत पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावात ३ हजार ३६७, भोसे या गावात ५८५, अभिजीत पाटील यांची जन्मभूमी असलेल्या देगाव मध्ये २१५८ मतांची तर सुस्ते या गावांमध्ये १२३२, पटवर्धन कुरोली या गावांमध्ये १२५७, गुरसाळे गावात १०४६ मतांची भरघोस आघाडी अभिजीत पाटील यांना मिळालेली आहे. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा प्रचार केला होता. मात्र कल्याणराव काळे यांच्या गावात अभिजीत पाटील यांना ५३ मताची, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे यांच्या नेमतवाडी गावात पाटील यांना १७६ मतांची आघाडी मिळालेली आहे. बाजार समितीचे माजी सभापती दिलीप घाडगे यांच्या सुस्त गावात अभिजीत पाटील यांच्या बाजूने पंढरपूर तालुक्याच्या ४२ गावांमध्ये अक्षरशः मतांची त्सुनामी आल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार, आणि काळे, भालके, गणेश पाटील यांच्या गटानेही अपक्ष रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पनाला लावली होती. मात्र सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नेते एका बाजूला व जनता दुसऱ्या बाजूला असे चित्र निर्माण झाले.

पंढरपूर तालुक्यातील गावनिहाय पुढीलप्रमाणे आहेत करोळे : अभिजीत पाटील ११०८ रणजीत शिंदे ९४८, कान्हापुरी अभिजीत पाटील १२७९ रनजीत शिंदे ५८५, उंबरे अभिजीत पाटील १८१८, रणजित शिंदे ७५१, जळोली अभिजीत पाटील १४०३ रणजित शिंदे ६४२, सांगवी पाटील ७५५ शिंदे ४२५, बादलकोट पाटील ३८९ शिंदे ३०१, करकंब पाटील ६१७८ शिंदे २८०७, बारडी पाटील ९३० शिंदे ६५७, जाधववाडी पाटील ६६१ शिंदे ३०१, मेंढापूर पाटील १९५३ शिंदे ६०४, पांढरेवाडी पाटील १२८९ शिंदे ७१३, भोसे पाटील ३१३२ शिंदे २५४७, नेमतवाडी पाटील ६९२ शिंदे ५१६, पेहे पाटील ७२५ शिंदे ३४०, नांदोरे पाटील १०९४ शिंदे ६५८, आव्हे पाटील ८८० शिंदे ५६३ , तरटगाव पाटील २०८ शिंदे १६४, पटवर्धन कुरोली पाटील २१३० शिंदे ८७३, पिराची कुरोली पाटील १८६६ शिंदे ९३५, वाडीकुरोली पाटील ८२७ शिंदे ७७४, देवडे पाटील ८४५ शिंदे ४६५, शेवते पाटील १२५३ शिंदे ५५६, खेड भोसे पाटील १२४४ शिंदे ५०६, सुगावभोसे पाटील ३५२ शिंदे १२६, होळे पाटील ११९३ शिंदे ७३०, चिलाईवाडी पाटील ७०१ शिंदे २८१, खरतवाडी पाटील ४७५ शिंदे ३९९, गुरसाळे पाटील २१३० शिंदे १०४६, आजोती पाटील ३५१ शिंदे १३८, बाभूळगाव पाटील १२५० शिंदे ६२८, रोपळे पाटील २२२०शिंदे ११७७, तुंगत पाटील १८८८ शिंदे १२७७, नारायण चिंचोली पाटील ७०७ शिंदे ५८१, आढीव पाटील १३४९ शिंदे ७१४, भटुंबरे पाटील ९१५ शिंदे ५८१, चिंचोली भोसे पाटील ६८१ शिंदे २३३, शेगाव दुमाला पाटील ९८४ शिंदे ६४८, देगाव पाटील २६४७ शिंदे ४८९, ईश्वर वठार पाटील ७०० शिंदे ३२१, आजनसोंडपाटील ९८८ शिंदे ६७५, बिटरगाव पाटील १९२ शिंदे १०५, सुस्ते पाटील २३४१ शिंदे ११०९ मते मिळाली आहेत.

अभिजीत पाटील यांना ४२ गावांमधून २४ हजार ४३३ मतांची आघाडी मिळाली आहे, बार्डी येथील बूथ क्रमांक २१८, भोसे येथील बूथ क्रमांक २३२, आणि वाडीकुरोली येथील बूथ क्रमांक २५१ वर रणजितसिंह शिंदे यांना अल्पमताची आघाडी मिळाली आहे. या व्यतिरिक्त ४२ गावातील इतर १११ बूथवर अभिजीत पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाल्यामुळे पाटील यांना विजय सहज शक्य झाला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ साली झाली, त्यानंतर झालेल्या तिन्हीपैकी दोन निवडणुकांमध्ये पंढरपूर तालुक्याने बबनदादा शिंदे यांची भक्कम साथ केलेली आहे. २०१४ साली बबन दादा शिंदे यांना कल्याणराव काळे यांच्याविरुद्ध पिछाडीस राहावे लागले होते. परंतु त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव रणजीत शिंदे यांना ४२ गावांनी साथ दिलेली नाही हे दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!