21 ते 25 दरम्यान बाजारात जनावरे आणू नयेत

पंढरपूर : ईगल आय मीडिया
दरवर्षी परंपरेने भरणारा माघी यात्रेचा जनावरांचा बाजार यंदा कोरोना आजारामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी दिली आहे.
पंढरपूर येथे दरवर्षी 4 प्रमुख यात्रा भारतात. त्याचबरोबर कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेच्या निमित्ताने जनावरांचा बाजार कृषि उत्पन्न बाजार समितीकडून भरवला जातो. गेल्या काही वर्षांपासून जनावरांचा बाजार वाखरी येथील पालखी तळावर भरवला जात आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट वाढल्याने, चैत्री आणि कार्तिकीचा जनावरांचा बाजार भरला नव्हता. मात्र गेल्या माघीचा बाजार झाला होता. यंदा अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्याने जनावरांचा माघी चा बाजार रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे 21 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान बाजारासाठी शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणू नयेत असेही आवाहन सभापती दिलीप घाडगे आणि उपसभापती विवेक कचरे यांनी केले आहे.