महालक्ष्मी फर्निचर शोरूम आगीत भस्मसात

कोट्यावधी रुपयांचे फर्निचर आगीत जळून खाक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील लिंक रोडवरील महालक्ष्मी फर्निचरच्या शोरुमला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आणि या आगीत शोरूम जळून खाक झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथील लिंक रोडलगत महालक्ष्मी फर्निचर्स हे फर्निचर चे भव्य शोरूम आहे. गेल्या काही वर्षांपासून हे शोरूम अतिशय नावारूपास आले होते. मात्र मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शोरूम मध्ये आग लागली.

या आगीत संपूर्ण शोरूम भस्मसात झाले असून 1 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही,मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

पंढरपूर नगरपरिषद अग्निशमन यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही आग आटोक्यात आणली. शहरातील भव्य असे फर्निचर शोरूम आगीत जळून खाक झाल्याचे समजताच खळबळ उडाली असून बघण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!