नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणारे अधिक

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची घटती रुग्ण संख्या

टीम : ईगल आय मीडिया

करोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये १९ हजार २१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १४ हजार ९७६ नवे करोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी नवीन करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा उत्साह वाढला आहे. आत्तापर्यंत राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.२६ टक्के इतके झाला आहे.

मागील चोवीस तासात ४३० जणांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६५ टक्के झाला आहे. आजपर्यंत १३ लाख ६६ हजार १२९ लोक पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात आज रोजी एकूण २ लाख ६० हजार ३६३ अॅक्टिव्ह केसेस आहेत.


सध्या राज्यात २१ लाख ३५ हजार ४९६ व्यक्ती या होम क्वारंटाइन आहेत तर २९ हजार ९४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ६६ हजार १२९ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ४३० मृत्यूंपैकी २३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०८ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!