पंढरपूर : eagle eye news
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निवडणूक बिगुल मंगळवारी वाजले असून निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 20 नोव्हेम्बर रोजी मतदान आणि 23 या तारखेला मतमोजणी होणार आहे.
यावेळी निवडणूक आयुक्तांनी आचारसंहितेची, मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्रावरील माहिती दिली. महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत, त्यापैकी पुरूष ४ कोटी ७७ लाख ,महिला मतदारांची संख्या ४.६६ लाख आहे. पूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यात २ टप्प्यात मतदान होणार आहे,
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान !
२२ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची तारीख, २९ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख, ३० ऑक्टोबर अर्ज छाणणी, ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख, २० नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख, २३ नोव्हेंबर रोजी निकाल
थोडक्यात निवडणूक प्रक्रिया
- २९ लाख हे नव मतदार असणार आहे.
- १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार आहे.
- महाराष्ट्रातील जिल्हे ३६ आहेत.
- एकूण मतदार संघ २८८
- एकूण मतदार ९ कोटी ६३ लाख मतदार
- पूर्णपणे महिला संचलित मतदान केंद्र असतील
- ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय करण्यात येणार
- ८५ पेक्षा अधिक वय असलेल्यांना घरून मतदान करता येणार
मतदान केंद्र २ किलोमीटरच्या आत हवे - ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर बसायला खुर्च्या असणार