पंढरीत 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी,

शासनाची आषाढी यात्रा नियमावली जारी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येत्या 20 जुलै रोजी साजऱ्या होत असलेल्या आषाढी यात्रे संदर्भात शासनाची नियमावली प्रसिद्ध झाली असून त्यानुसार 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर शहर आणि आसपासच्या 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान विठ्ठल दर्शन, चंद्रभागा स्नान ही बंद ठेवण्यात येत आहे.

वारकरी संप्रदायातील मनाच्या 10 पालखी सोहळ्यानाच प्रतिकात्मक वारी साठी परवानगी दिली असून हे पालखी सोहळे शासनाच्या एस टी बसने आषाढ शुद्ध दशमी च्या दिवशी 19 जुलै रोजी वाखरी येथे येतील आणि तेथून एकून 20 वारकऱ्यांच्या सोबत माना प्रमाणे इसबावी विसावा येथपर्यंत पायी चालत जातील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान पंढरपूर शहर, वाखरी, गोपाळपूर, शिरढोन, लक्ष्मी टाकळी, शेगाव दुमाला, चिंचोली भोसे सह लगतच्या 9 गावात 17 ते 25 जुलै दरम्यान संपूर्णतः संचार बंदी जाहीर करण्यात आली आहे. आषाढी यात्रेची एकूण नियमावली सोबत जोडलेल्या फोटो मध्ये आहे. ती वाचावी.

Leave a Reply

error: Content is protected !!