लॉकडाऊन काळात १९ कोटी ८८ लाखांचा दंड वसूल

कोविड संदर्भात सव्वा २ लाख गुन्हे दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख

 मुंबई : ईगल आय मीडिया

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख २५  हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नियम भंग केल्याबद्दल 19 कोटी 88 लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते ९ ऑगस्टपर्यंत  कलम १८८ नुसार २,२५,३८०  गुन्हे नोंद झाले असून ३३,११७ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्ह्यांसाठी  १९ कोटी ८८ लाख ०५  हजार ३५ ४ रु. दंड आकारण्यात आला. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख २४  हजार २१५   पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३३२ घटना घडल्या. त्यात ८८८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर- १ लाख
९ हजार  फोन
पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०९,७९३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६. वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९५,६६२ वाहने जप्त करण्यात आली अशीही माहिती ना. देशमुख यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!