उमेद कर्मचारी आंदोलनास महासंघांचा पाठिंबा : कार्याध्यक्ष सचिन जाधव

मुंबई : ईगल आय मीडिया

येथील आझाद मैदानावर आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव सर यांनी उमेद कर्मचारी यांचे आंदोलनास पाठिंबा जाहिर केला. या प्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उमेद कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षा चेतन लाटकर, सचिव बलवीर मुंढे, अर्चना शहा, सचिव शाहरूख मुलाणी, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे खजिनदार शंकर बंडगर उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचारी यांना कायम करा- कार्याध्यक्ष सचिन जाधव

राज्यात नवी भरती न करता जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना कायम करा. कंत्राटी कर्मचारी यांचे खासगीकरण कदापी होऊ देणार नाही. राज्यातील तीन लाख कंत्राटी कर्मचारी हा निर्णय हाणून पाडतील. शासन व्यवस्था या निर्णयामुळे खिळखिळी होणार आहे. उमेद चे सीआरपी यांना दहा हजार रूपये मानधन करा. कंत्राटी कर्मचारी यांचे खासगीकरणाचे पाप करू नका असे आवाहन कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी केले.

ग्रामविकास विभागाने उमेद मधील व राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विरोध करणेसाठी सुरू असलेल्सा आझाद मैदानावरील आंदोलनास आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांचे मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी पाठिंबा जाहिर केला.

विधानमंडळास अंधारात ठेवून खाजगीकरण : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस
राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांचे खासगीकरण करून कंपनीस देण्याच्या शासनाच्या निर्णयास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी कडाडून विरोध केला. विधान सभा व विधान परिषदेस अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचारी यांचे खाजगीकरण होऊ देणार नाही. यास विरोध राहिल असे त्यांनी निक्षून सांगितले.

९ फेब्रुवारी २०१८ चे शासन परिपत्रक रद्द करणेसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. ते परिपत्रक अध्यक्ष मुकुंद जाधवर व ४३ संघटनांच्या महासंघाने रद्द करणेस शासनास भाग पाडले होते त्यामुळे राज्यातील कंत्राटी कर्मचारी शांत बसणार नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!