डॉ. सौ. शोभा कराळे याचे म.बसवेश्वर यांच्या गौरवार्थ व्याख्यान
फोटो
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त पंढरीत महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.
पंढरपूर : ईगल आय न्युज
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त पंढरपूर येथील आद्य वीरशैव महिला मंडळाच्या वतीने भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे स्वतः पाटील हि या रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीचा शुभारंभ करताना अभिजित पाटील यांनी, मोटार सायकल रॅली महिला सबलीकरणाचे प्रतिक असल्याचे सांगितले.
यावेळी मंडळाच्या महिलानी लेझीम खेळून रॅलीला सुरवात केली. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन प्रमुख पाहुण्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते झाले. तर प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. शोभा कराळे यांनी केले.
या वेळी डॉ. सौ. शोभा कराळे याचे म.बसवेश्वर यांच्या गौरवार्थ व्याख्यान ही संपन्न झाले. यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.या साठी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा विशालाक्षी पावले, संजीवनी ठिगळे, महानंदा भिंगे, निर्मला भिंगे, कविता पावले, ठिगळे. आरती पावले, माधुरी भिंगे सुनिता राहिरकर, अदिती डोंबे, स्नेहल म्हमाणे, सुवर्णा स्वामी, अनुराधा स्वामी यांनी परिश्रम घेतले.