पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने पहिल्याच सभेत एकजुटीचे प्रदर्शन केले आहे. पोटनिवडणूक महाविकास आघाडी अभेद्य एकजुटीने लढण्याचे संकेत दिले.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत. तत्पूर्वी येथील संत तनपुरे महाराज मठात आयोजित महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्राणितीताई शिंदे, आम.संजय शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, काँग्रेसचे गट नेते चेतन नारोटे, प्रहार संघटनेचे संतोष पवार, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी, शिवसेनेचे जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे -पाटील, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दिलीप देवकुळे, पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्यासह सर्व घटक पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यानिमित्ताने महाविकास आघाडीने एकोप्याने पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.