मनसेच्या महिला मोर्चाची शासनाकडून दखल : विभागीय आयुकांनी काढले लेखी आदेश
मनसेच्या याच भव्य मोर्चानंतर वसुलीसाठी सक्ती नको असा आदेश निघाला आहे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महिला बचत गट, आणि इतर कर्जदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून महिला बचत गट, बँका, फायनान्स सह इतर वित्तीय संस्थांनी सक्तीने वसुली करू नये असे आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी काढले आहेत. नुकतेच मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी या प्रश्नी भव्य महिला मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हा निर्णय झाल्यामुळें अडचणीत असलेल्या या घटकांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात मनसेचे आणि या संघटनेचे नेते दिलीप धोत्रे यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
कोरोनाच्या या महामारीमध्ये सर्वच छोटे मोठे व्यवसाय ठप्प होऊन बसले आहेत, बँकांनी दिलेलं भांडवलही संपले आहे. आशा वाईट काळातही बँका आणि इतर वित्तीय संस्थेच्या वतीने वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यावर इलाज म्हणून मनसेच्या माध्यमातुन मागील सहा महिन्यांपासून या कर्जदारांना दिलासा देत कर्ज माफीसाठी मोर्चा बैठका घेऊन मोठा आधार दिला होता.
मागील पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यांतून ठिकठिकाणी महिला मेळावे, मोर्चे काढून महिलांना बचतगट कर्जातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता.कर्जाचा त्रास आणि वसुलीची अडचण लक्षात घेता या सर्व गोष्टीची दखल घेऊन शासन स्तरावर पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव यांनी1 अक्टोबर रोजी लेखी आदेश काढून चक्क सर्वच बँका, पतसंस्था, फाईनान्स, आणि इतर वित्तीय संस्थांना वसुलीसाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग अवलंबून करू नाही, तसे झाल्यास कारवाई करावी लागेल असे आदेश देण्यात आले आहेत.
कोविड19 च्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन केले होते. त्यामुळे व्यवसाय बंद होते,त्यामुळे अडचणीत असलेल्या या कर्जदारांना सध्या त्रास होणार नाही, याची दक्षता बँका आणि सर्व वित्तीय संस्थांनी घ्यावी, शा सूचना देण्यात आल्या आहेत. यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष ठेऊन दर महिन्याला आढावा घेण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.