समृद्धी महामार्गावर भिषण अपघात :13 मजूर ठार

टीम : ईगल आय मीडिया


बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव – दुसरबिड येथे समृद्धी महामार्ग कॅम्पस जवळ झालेल्या भीषण अपघातात तब्बल 13 जनांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जखमींना जालना येथील दवाखान्यात हलविले आहे.

या दुर्घटनेतील मृतांची ओळखी अद्याप पटली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक व पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहे. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं.


लोखंडी सळई आणि मजूर घेऊन महामार्गाच्या कामावरील टिपर जात होता अशी माहिती आहे. बाहेर राज्यातील मजूर असल्याची प्राथमिक माहिती असून समृद्धी महामार्गावर तढेगाव येथे अपघात झालाय. दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी  महामार्गाच्या कामावर हे मजूर जात होते. त्यावेळी तढेगाव येथे हा अपघात झाला.

सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगावमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला डंपरवरुन १६ मजूर प्रवास करत होते. समोरुन येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी डंपरचालकाने तो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तो पलटला आणि मोठा अपघात घडला.

अरुंद रस्त्यावरुन समोर येणाऱ्या बसला जागा करुन देण्याच्या प्रयत्नात डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की डंपरमधील सळई मजुरांच्या अंगात आणि पाठीमध्ये घुसल्या आहेत. त्यामुळेच घटना स्थळीच आठ मजूरांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर काम करणारे परप्रांतीय मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण ट्रकमध्ये 15 मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!