गाव बंद ठेवण्याचा निर्णय : swab अहवालाकडे लक्ष
मळोली : ईगल आय मीडिया
मळोली ( ता. माळशिरस )
येथील आठ लोक क्वारटाईन करण्यात आलेले आहेत. या आठ जणांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत पूर्ण गाव बंद ठेवण्याचे आदेश माळशिरस चे तहसीलदार श्री अभिजीत पाटील यांनी दिलेले आहेत.
एका लग्न समारंभात बाहेरून आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा प्रकार घडला आहे. माळशिरस तालुक्यात ग्रामीण भागातील रुग्ण वाढू लागल्याने शासकीय यंत्रणेवर्ती ताण येऊ लागला आहे. मळोली गावामध्ये फक्त मेडिकल व दुग्ध व्यवसायिक यांना काही काळ यातून सवलत दिलेली आहे. गावात विनाकारण फिरणारी व्यक्ती आढळल्यास महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यावतीने दंड आकारण्यात येणार आहे.
यावेळी वेळापूर आरोग्य विभागाचे डॉ ओव्हाळ, मंडलाधिकारी रणसुभे, तलाठी ठोंबरे, ग्रामसेवक शिवाजी कदम, पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव, सरपंच गणेश पाटील आदी उपस्थित होते.