ग्रामस्थांना दिलासा : गाव बंदीवर होणार फेर विचार
मळोली : ईगल आय मीडिया
मळोली ( ता. माळशिरस ) येथे क्वारंटाईन केलेल्या सर्व 8 जणांचे रॅपिड टेस्ट अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून आता गाव बंदीचा निर्णय संध्याकाळी सर्व ग्रामस्थांशी चर्चा करून घेतला जाणार आहे.
13 जुलै रोजी माळशिरस येथे सापडलेल्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात येथील 8 जण आले होते. त्यामुळे त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते आणि त्यांची रॅपिड swab टेस्ट घेण्यात आली. त्या सर्व आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वेळापूर आरोग्य केंद्राचे श्री डॉ ओव्हाळ यांनी दिली.
रात्री अचानक मळोली गावातील लग्नसमारंभात आठ व्यक्ती संपर्कातील व्यक्तींना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्याने क्वारटाईन करण्याचे आदेश तहसीलदार श्री अभिजीत पाटील यांनी दिले होते.
आज या आठही जणांचे swab तपासण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री रामचंद्र मोहिते यांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची रॅपिड टेस्ट घेतल्यानंतर ते आठही रुग्ण निगेटिव्ह असल्याचं डॉ रामचंद्र मोहिते यांनी सांगितले.
या प्रकरणाने तणावाखाली असणारे गावकरी यांना दिलासा मिळाला आहे.